मूळव्याध होण्याची कारणे | मूळव्याधीची लक्षणे | मूळव्याधीवरील उपचार । Vitthal Piles Center
मूळव्याध होण्याची कारणे | मूळव्याधीची लक्षणे | मूळव्याधीवरील उपचार । Vitthal Piles Center, Pune
मूळव्याध म्हणजेच पाइल्स (Piles) हा एक सर्वसामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ(anus) असलेला कोंब. मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात. पहिला आतील मूळव्याध जो गुदाशयाच्या आतमध्ये विकसित होतो आणि दुसरा बाहेरील मूळव्याध जो बाहेर म्हणजे गुदाशयाच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो. मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या म्हणजेच मूळव्याधीचा कोंब(Hemorrhoids sprout) असतो. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास सौम्य स्वरूपाचा असतो आणि रुग्णाला काही लक्षणे जाणवत नाहीत.
मूळव्याध होण्याची कारणे/ Causes of Piles-Hemorrhoids
मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होऊ शकतो. मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे सुद्धा होऊ शकतो. आहारात Fiber पदार्थांची कमतरता असल्यामुळे Constipation होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. मूळव्याध होण्याची काही खालील कारणे –
- अतिरिक्त वजन किंवा स्थूलपणा
- आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव व त्यामुळे सतत बद्धकोष्ठ असणे.
- दीर्घकालीन जुलाब
- सतत जड वस्तू उचलणे
- सतत खोकला किंवा वारंवार उलट्या
- बैठी जीवनशैली
- गर्भावस्था – बाळाच्या जन्मानंतर बरेचदा रक्तस्त्राव थांबतो.
- ४५ वर्षापेक्षा जास्त वय – जसे जसे वय वाढत जाते तसे तसे शरीराचे स्नायू, रक्तवाहिन्या व आधार देणारे इतर अनेक घटक कमकुवत होत जातात आणि मूळव्याध होण्याचा धोका वाढत जातो.
- अनुवंशिकता
मूळव्याधीची लक्षणे/ Symptoms of Piles-Hemorrhoids
बहुतेक वेळा मूळव्याधीची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात आणि उपचाराशिवाय काही दिवसात बरी होऊ शकतात. काही लोकांना लक्षणे न जाणवल्यामुळे मूळव्याधीचा त्रास आहे हे देखील रुग्ण समजू शकत नाही.
परंतु जेव्हा त्रास होतो त्यावेळी खालील लक्षणे जाणवतात –
- शौचानंतर रक्तस्त्राव होणे. हे रक्त लालभडक रंगाचे असते.
- मूळव्याधीला रक्तपुरवठा कमी पडल्यास किंवा थांबल्यास मूळव्याध दुखत नाही.
- गुदद्वाराजवळ खाज
- गुदद्वाराजवळ कोंब बाहेर आल्यनंतर हा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो
- शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्त्राव येणे
- गुदद्वाराजवळ दुखणे, लाल होणे किंवा सूजने.
- मूळव्याधीवरील उपचार/ Treatments of Piles
मूळव्याधीचा त्रास बरेचदा कोणत्याही उपचाराशिवाय काही दिवसात बरा होतो. परंतु गुदद्वाराजवळील खाज आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत.
सर्वप्रथम आहारातील बदल आणि शौचाच्या वेळी जोर न करणे.
आहारातील बदल व स्वतः घ्यायची काळजी
- यासाठी आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढवावे – फळे, पालेभाज्या, कोशिंबिरी, सुकामेवा, कडधान्ये इ. पदार्थ तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत.
- भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, विशेषत: पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन टाळावे. मद्यपान टाळावे.
- शौचाच्या वेळी खालील काळजी घ्यावी –
- शौचाच्या वेळी कुंथू नये / जोर करु नये.
- शौचानंतर मऊ toilet paper वापरावा.
- शौचानंतरची स्वच्छता हळुवारपणे करावी.
आपल्याला होणारा मूळव्याधीचा त्रास बद्धकोष्ठामुळे असेल तर शौच नियमित व सुलभ होणे आवश्यक आहे. यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागणार नाही.
मूळव्याध साठी लेझर उपचार काय आहे(What is laser treatment for Piles)?
मूळव्याध साठी लेझर उपचार कमी हल्ल्याचा आहे. बाधित क्षेत्रात कोणतीही कापणी होत नाही. प्रभावित भागावर लेझर ऊर्जेचा अचूक रीतीने उपचार होऊ शकतो आणि ही समस्या त्वरित सोडविली जाते. शस्त्रक्रियेनंतर रूग्ण त्वरित आपले सामान्य दिनचर्या सुरू करू शकतात. डॉ. अतुल पाटील पुणेमधील मूळव्याधासाठी उत्तम लेझर उपचार देतात. विठ्ठल पाइल्स सेंटर मूळव्याधासाठी जगातील प्रगत लेसरची सर्वाधिक आवृत्ती आहे.
Comments
Post a Comment